जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर - अनेक दिग्गजांचे गणित चुकले
जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर - अनेक दिग्गजांचे गणित चुकले
लेवाजगत न्यूजजळगाव – जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीत एकूण ६८ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून यात अनेक मान्यवरांचे गट आरक्षित झाल्याने त्यांचे राजकीय गणित चुकले आहे, तर काहींचे गट मात्र अबाधित राहिल्याचे दिसून आले.
या सोडतीनुसार —
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३१ जागा,
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८ जागा,
अनुसूचित जातींसाठी १३ जागा आणि
अनुसूचित जमातींसाठी ६ जागा — असे एकूण ६८ गट निश्चित झाले आहेत.
यापैकी ५० टक्के (३४ जागा) महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पातोंडा, घोडेगाव, म्हसावद, शहापूर, म्हसवे, दहिवद, कासोदा, मेहुणबाणी, शिरसोदे, टाकळी प्र.चा., पिंपळगाव बुद्रुक, विखरण, नाडगाव, पाळधी, पातोंडा, नेरी दिगर, भालोद, लिहिले.
सर्वसाधारण प्रवर्ग
उंबरखेड, लोहटार, नगरदेवळा बुद्रुक, बांबरुड प्र. बो., बहाळ, तामसवाडी, शिरसमणी, मांडळ, गिरड, तळई, कळमसरे, पाळधी खुर्द, न्हावी प्र. यावल, लासुर, पहुरपेठ, गुढे, साळवा, कुसंबे खुर्द, तोंडापूर, कजगाव, बेटावद बुद्रुक, जानवे, रांजणगाव, हरताळे, शिरसोली प्र.न., कुन्हे प्र.न., शेलवड, साखळी, लोहारा, ऐनपूर, सायगाव.
अनुसूचित जमाती प्रवर्ग
विरवाडे, धानोरा प्र.अ., अडावद, घोडगाव, चहार्डी, हिंगोणे, किनगाव बुद्रुक, केहाळे बुद्रुक, चिनावल, कुर्डे, कानळदा, आसोदा, पिंप्री खुर्द.
अनुसूचित जाती प्रवर्ग
वाघोड, निंभोरा बुद्रुक, वाघोदा बुद्रुक, अंतुर्ली, कंडारी, निंभोरा.
या सोडतीनंतर अनेक राजकीय गटांमध्ये नवीन समीकरणे व चर्चांना उधाण आले असून, काही प्रमुख गट आरक्षित झाल्याने संभाव्य उमेदवारांना आपले गणित नव्याने मांडावे लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत