Contact Banner

सावदा न.पा. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार चाचपणी गुरुवारी दुपारी

सावदा न.पा. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार चाचपणी गुरुवारी दुपारी


सावदा न.पा. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार चाचपणी गुरुवारी दुपारी

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – सावदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे इच्छुक उमेदवारांची चाचपणी गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

सावदा नगरपरिषद क्षेत्रातील एकूण १० प्रभागांतून २० नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष लोकनियुक्त पद्धतीने निवडले जाणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी तसेच स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यासाठी ही चाचपणी आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, या मुलाखती सावदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालय, रिलायन्स पेट्रोलपंपजवळ दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडतील.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेशभाऊ वानखेडे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते व उद्योजक हाजी हारून सेठ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चाचपणीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि पक्षनिष्ठेच्या आधारे आपली भूमिका मांडायची आहे. स्थानिक स्तरावर मजबूत संघटन उभारणी व जनतेशी संपर्क वाढविणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहराध्यक्ष कुशल जावळे आणि युवक शहराध्यक्ष अजय चौधरी यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आपल्या समर्थकांसह वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.