Contact Banner

सावद्यात निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात हालचालींना वेग

 

Movements in the Nationalist Party (NCP) Ajit Pawar's group gain momentum before the elections in Savda

लेवाजगत

सावद्यात निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात हालचालींना वेग

लेवाजगत न्यूज सावदा – सावदा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरात प्रभावी वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते व माजी नगराध्यक्ष राजेश गजाननराव वानखेडे यांनी आगामी निवडणुकीत तब्बल २० उमेदवारांसह निवडणुकीच्या रणसज्जतेला सुरूवात केल्याचे समजते.

गेल्या काही वर्षांत सावदा शहरात वानखेडे यांचे राजकीय बळ वाढले असून, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘घड्याळ’ या चिन्हावर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्याने वानखेडे गटातर्फे कोणाला नगराध्यक्षपदाची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटाच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू असून, “वानखेडे गटातून कोण नगराध्यक्षपदाची माळ चढवणार?” या चर्चेला शहरात उधान आले आहे.

दरम्यान, सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होते का की हे पक्ष स्वतंत्रपणे लढतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या या संभाव्य युतीच्या चर्चांनी शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे.

राजकीय चर्चांच्या आणि उमेदवारांच्या हालचालींमुळे सावदा शहरातील वातावरण दिवसेंदिवस तापत असून, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीचे राजकीय समीकरण कोणत्या दिशेने झुकते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.