Header Ads

Header ADS

रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

 



रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय  ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर


उरण(सुनील ठाकूर):- रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे प्रमुख क्षिक्षक व सचिव श्री  सुभाष गोकुळ पाटील व अनिल म्हात्रे यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला .

ही स्पर्धा इनडोअर स्टेडियम डेरवन रत्नागिरी येथे २३ ते २५ अॅाक्टोबर २०२५ रोजी होणार आहे .

मुले:- समर्थ भराडे, विनीत शिंदे,ओम भोईर , पृथ्वी पाटील, पुष्कराज पाटील, वज्द टकये, स्पर्श मर्चंडे, गोपाळ पुरी,राहुल शहा, आर्यन मर्चंडे इ.

संघ प्रशिक्षक :- तेजश माळी 

व्यवस्थापक :- राकेश जाधव 

मुली:- पवित्रा कदम, सानिका म्हात्रे,श्रेया लालु, अफीया टाकये,तुबा गांगरेकर, ऋत्विका बनकर आणि राधिका नारायण 

संघ प्रशिक्षिक :- प्राजक्ता अंकोलेकर 

व्यवस्थापक :- अक्षय पवार 

पुमसे खेळाडू: - विनीत शिंदे ,राधिका नारायण ,नंदीनी गुंजाळे , प्रफुल्ल राठोड,श्रुस्ठी प्रभू,प्रांजळ टेंबे,श्रेया कोडे, नंदीनी देवानी, दीक्षांत माळी आणि पवन गुप्ता 

पूमसे प्रक्षिक्षक :- शुभम पवार 

राष्ट्रीय पंच - शैलेश कदम व प्रशांत घरत ह्यांची पंच म्हणुन निवड झाली आहे

                   या राज्यस्तरीय सब - ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो  ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने ३० अॅाक्टोम्बर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी कोरमंगला इनडोअर स्टेडियम बेंगळूर कर्नाटका येथे होणार्‍या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.