वडताल धाम येथे श्री शिक्षापत्री द्विशताब्दी व श्री आचार्य स्थानपान द्विशताब्दी महोत्सवाचे आयोजन
वडताल धाम येथे श्री शिक्षापत्री द्विशताब्दी व श्री आचार्य स्थानपान द्विशताब्दी महोत्सवाचे आयोजन
लेवाजगत न्यूज वडताल (ता. नाडियाद गुजरात)-भगवान श्री स्वामिनारायण परंपरेतील पवित्र तीर्थक्षेत्र श्री वडतालधाम येथे येत्या ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्री शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सव आणि श्री आचार्य स्थानपान द्विशताब्दी महोत्सव भव्य उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत.
या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आचार्य महाराजश्रींनी पवित्र संतगण आणि भक्तगणांसह सभा मंडप व टेंट सिटीला भेट दिली. यावेळी संतांनी आणि सेवकांनी उत्सवाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.
हा ऐतिहासिक सोहळा वडतालधाममध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत अध्यात्म, भक्ति आणि सेवाभावाच्या वातावरणात साजरा होणार असून विविध धार्मिक कार्यक्रम, सत्संग सभा, भजन संध्या आणि शिक्षापत्री दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत