Contact Banner

रन फॉर युनिटीद्वारे एकतेचा संदेश — सरदार पटेल जयंतीनिमित्त सावद्यात “रन फॉर युनिटी”चे आयोजन

 

Run-for-Unity-Savda-Police-Organized-Marathon-on-Sardar-Patel-150th-Jayanti


रन फॉर युनिटीद्वारे एकतेचा संदेश — सरदार पटेल जयंतीनिमित्त सावद्यात “रन फॉर युनिटी”चे आयोजन


लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर):भारताचे लोहपुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता “रन फॉर युनिटी” या एकात्मतेच्या धाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याचा उद्देश आहे.


हा कार्यक्रम दुर्गा माता मंदिर, सावदा (ता. रावेर) येथून सुरू होणार असून, सावदा शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला मंडळे तसेच सामाजिक संस्था यांनी या धाव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


या एकात्मतेच्या धाव उपक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा पोलीस दल व सावदा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि त्यांच्या स्टाफकडून नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या उपक्रमातून “एक भारत – श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होणार असून, नागरिकांच्या सहभागातून देशातील एकता आणि बंधुतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.