Contact Banner

जळगावात भीषण अपघात; रामदेववाडीतील तरुणाचा जागीच मृत्यू

 

जळगावात भीषण अपघात; रामदेववाडीतील तरुणाचा जागीच मृत्यू


लेवाजगत न्युज जळगाव (प्रतिनिधी):

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे बुधवारी (२९ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या भीषण अपघातात एक तरुण दुर्दैवी मृत्यूमुखी पडला. रात्री सुमारे ८.३० वाजता ही घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २९, रा. रामदेववाडी) हे चायनिज दुकानावरून नास्ता करून पायी घरी जात होते. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मुकेश राठोड गंभीर जखमी झाले.


त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.


या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मृत मुकेश राठोड हे बांधकाम बिगारीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार असून, एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.