Header Ads

Header ADS

सावद्यात बुधवारी स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव

 

 सावद्यात बुधवारी स्वामीनारायण मंदिरात अन्नकुट महोत्सव


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, सावदा :-
दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने येथील स्वामीनारायण मंदिरात २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेष आकर्षण ठरणार आहे अन्नकोट महोत्सव, जो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी साजरा होणार आहे, अशी माहिती कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास यांनी दिली.

अन्नकोट महोत्सव हा स्वामीनारायण संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. गोवर्धन पूजनानिमित्ताने भगवंताला ५६ भोग नैवेद्य दाखवले जातात व त्यानंतर सर्व हरिभक्तांमध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. पंचक्रोशीतील हरिभक्त या पवित्र सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.


या महोत्सवासाठी शास्त्री स्वयंप्रकाशदास, शास्त्री धर्मकिशोरदास, शास्त्री भक्तीप्रियदास, भंडारी शास्त्री माधवप्रियदास आणि पुजारी सत्यप्रकाशदास यांनी मन:पूर्वक परिश्रम घेऊन स्वादिष्ट ५६ भोग पदार्थ तयार केले आहेत. तसेच स्वामीनारायण युवक मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिर सुंदररित्या सजविले आहे.

 भक्तीभाव, प्रसाद व सौहार्द यांचा संगम घडवणारा हा अन्नकोट उत्सव पाहण्यासाठी सावदा परिसरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.