Header Ads

Header ADS

भुसावळात २६ रोजी लिंगायत कोष्टी समाजाचा परिचय मेळावा


भुसावळात २६ रोजी लिंगायत कोष्टी समाजाचा परिचय मेळावा




लेवाजगत न्युज भुसावळ:-


लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे २६ ऑक्टोबरला लोणारी समाज मंगल कार्यालयात ६वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा होईल. समाजातील तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा होईल.


अध्यक्षस्थानी प्रा. राजेश कोष्टी, तर उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार कडे, भिवंडी येथील मुख्याध्यापिका नंदा कोंगे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. नीलेश घोडके, अरुण सोनोने, डॉ. संध्या कोंगे, शारदा कोष्टी, प्रवीण उमराणे, रवींद्र येलगिरे यांची उपस्थिती राहिल. येलगिरे मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी २२ सप्टेंबरपासून सुरू आहे. मेळाव्याच्या दिवशी सकाळी ९ पासून प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. मेळावा आयोजनासाठी विविध समित्या गठित केल्या आहेत. नोंदणी, स्वागत, भोजन, सभास्थळ सजावट, तांत्रिक सहाय्य, निवास व मार्गदर्शन अशा या समित्या असल्याचे मुकेश कोष्टी यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.