Contact Banner

सुभद्रा सिद्धार्थ बडगे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात

 


सुभद्रा सिद्धार्थ बडगे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :- सावदा शहरातील शांत, संयमी आणि सर्वांना परिचित असलेल्या माजी नगरसेवक सिद्धार्थ बडगे यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुभद्रा सिद्धार्थ बडगे यांनी येऊ घातलेल्या सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

सुभद्रा बडगे या यापूर्वीही सावदा नगरपालिकेत सलग दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकण्याचा मान मिळवला असून, त्यांचे पती सिद्धार्थ बडगे हे देखील एक पंचवार्षिक नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले आहेत. सार्वजनिक कार्यात दोघांचेही सक्रीय योगदान असल्याने बडगे दांपत्याचे सावदा शहरात विशेष स्थान आहे.

सुभद्रा बडगे यांच्या उमेदवारीच्या घोषणेने आता सावदा शहराच्या राजकारणात नवचैतन्य आणि चर्चांना ऊत आला आहे. सध्या त्या कोणत्या पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, त्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

शहरातील नागरिक आणि राजकीय वर्तुळात या उमेदवारीनंतर विविध चर्चा सुरू असून, बडगे कुटुंबीयांच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या कार्यशैलीचा नगरपालिकेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.