Contact Banner

धक्कादायक प्रकार : शे.घाट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसाचाच कारनामा!


  धक्कादायक प्रकार : शे.घाट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसाचाच कारनामा!

हेड मोरर भूषण ब्राह्मणे निलंबित 

लेवाजगत न्युज वरुड (निलेश लोणकर) :-
वरुड तालुक्यातील शे.घाट पोलीस स्टेशन मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाण्यातीलच कर्तव्यावर असलेल्या हेड मोरर भूषण ब्राह्मणे यांनी पोलीस पाटलांचे मानधन परस्पर लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शे.घाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १४ पोलीस पाटलांचे जानेवारी ते मार्च महिन्यांपर्यंतचे एकूण अंदाजे ₹४ लाख १६ हजार रुपयांचे मानधन थकीत होते. यासंदर्भात पोलीस पाटलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडे तक्रार केली. तपासादरम्यान हे मानधन पोलीस स्टेशनमध्ये जमा झाल्याचे समोर आले. मात्र संबंधित पोलिस पाटलांना रक्कम न मिळाल्याने अधिक चौकशी करण्यात आली.


या चौकशीत हेड मोरर भूषण ब्राह्मणे यांनी मानधनाची रक्कम परस्पर लंपास केल्याचे उघड झाले, त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

📍 स्थान: शे.घाट पोलीस स्टेशन, वरुड तालुका
📍 निलंबित अधिकारी: हेड मोरर भूषण ब्राह्मणे
📍 अपहार रक्कम: ₹४,१६,०००
📍 प्रभावित पोलीस पाटील: १४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.