फैजपूरमध्ये ५ नोव्हेंबरला “स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव” — १७७ वं वर्ष साजरा होणार!
फैजपूरमध्ये ५ नोव्हेंबरला “स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव” — १७७ वं वर्ष साजरा होणार!
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, फैजपूर :
फैजपूर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा असलेला “स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव” यंदा ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.
सन १८४८ मध्ये सुरू झालेला हा पवित्र उत्सव यंदा आपल्या १७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
या पारंपरिक सोहळ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून, मंदिर परिसर आणि पांडुरंगाचा रथ आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे. शहरातील मुख्य मार्गांवर फुलांची सजावट व विद्युत प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
भक्तांच्या “जय पांडुरंग! जय विठ्ठल!” घोषात भगवान पांडुरंगाचा रथ नगरपरिक्रमेच्या मार्गाने प्रवास करणार आहे.
या वर्षी रथोत्सवाचा मार्ग पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला आहे —
होले वाडा, लक्कड पेठ, मोठा मारुती मंदिर मार्गे रथ सुभाष चौक येथे पोहोचेल, जिथे पहिली आरती होईल.
त्यानंतर रथ खुशाल भाऊ रोड वरून श्रीराम मंदिराजवळ पोहोचेल, येथे दुसरी आरती होईल.
यानंतर विठ्ठल मंदिर वार्ड, जुने हायस्कूल, ब्राह्मण गल्ली मार्गे रथ गल्ली येथे रथ पोहोचेल, जिथे महा आरतीने समारोप केला जाईल.
रथमार्गावर भजन, कीर्तन, महाप्रसाद वितरण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण फैजपूर शहर भक्तीभावाने उजळून निघाले असून, शेकडो भाविक भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक प्रशासनाने सुरक्षेची व वाहतुकीची काटेकोर व्यवस्था केली असून, स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत