धनाजी नाना महाविद्यालयात आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन
धनाजी नाना महाविद्यालयात आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन
लेवाजगत न्यूज फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आंतर विभागीय धनुर्विद्या पुरुष व महिला स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडेसर हे होते, तर उदघाटक म्हणून भोळे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे फॅक्लटी मेंबर प्रा. डॉ. संजय चौधरी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत जीमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे, डॉ. बी. आर. मोरे, डॉ. तेजस शर्मा, प्रा. डॉ. मुकेश पवार, डॉ. क्रांति वाघ, डॉ. सचिन पाटील, डॉ. हर्ष सरदार, प्रा. डॉ. उमेश पाटील, डॉ. आर. बी. कांबळे आदि उपस्थित होते. सदरील स्पर्धेत विद्यापीठ परिसरातील जळगाव, एरंडोल आणि नंदुरबार या तीन विभागातील पुरुष व जळगाव आणि एरंडोल या दोन विभागातील महिला संघानी इंडियन राऊंड. रिकर्व्ह राऊंड आणि कंपाऊंड राऊंड या तीन प्रकारात पुरुष व महिला संघांनी सहभाग नोंदविला. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ए. के. पाटील यांनी केले व सूत्र संचालन प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले आणि आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.
उद्घाटन समारंभात आध्यक्षस्थानी बोलताना प्रा, डॉ. हरिष नेमाडे सर यांनी तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचा इतिहास सांगितला व या पवन आणि पवित्र भूमीतून आपण खेळासाठीच नव्हे तर जीवनासाठी सुद्धा ऊर्जा घेऊन जावी असे संगितले. यासोबतच धनुर्विद्या हा खेळ भारतीय प्राचीन खेळ असल्या मुळे व विशेष करून या खेळात आदिवशी निपुण असतात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते नक्कीच कमी वेळेत चांगले यश प्राप्त करून स्वतचे व परिसराचे नाव लौकिक करू शतात असे संगितले. उद्घाटक म्हणून बोलतांना प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी धनुर्विद्या हा खेळ आपल्या विद्यापीठ परीक्षेत्रात फक्त फैजपूर भालोद आणि पाल याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळल्या जातो या बद्दल येथील खेळाडुंचे अभिनंदन केले पण विद्यापीठ परिसरातील विविध भागातील महाविद्यालयांनी या खेळात सभाग घेऊन ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सहभाग घेता येतो असे सांगितले. सर्वांना शुभेच्छा देऊन भटिंडा पंजाब येथे होणार्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान केले.
प्रस्ताविकात प्रा. डॉ. ए. के. पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष लोकप्रिय नेते मा. आमदार मा. श्री. शिरिषदादा मधुकरराव चौधरी यांनी व सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगितले व श्री. शिरिषदादा मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. तसेच मागील पाच ते सहा वर्षा पासून धनुर्विद्या या खेळातील महाविद्यालयाचा चढता आलेख सांगितला व आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी ओम कोळी याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या भारतीय सघाच्या निवड चाचणीत पहिल्या ५० खेळाडू येण्याचा बहुमान प्राप्त केला होता. या सोबतच बर्याच खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सदरील खेळात पदक प्राप्त केल्याचे सांगितले. धनुर्विद्या सारख्या खेळाला संस्थेतर्फे व महाविद्यालयातर्फे खेळाडूंना भरीव अशी मदत केल्या जात असल्याचे सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे पुरुषांमध्ये जळगाव विभाग प्रथम, नंदुरबार विभाग दुसर्या स्थानावर तर एरंडोल विभाग तृतीय राहिले. महियांमध्ये जळगाव विभाग प्रथम, एरंडोल विभाग व्दितीय स्थानी राहिले. यास्पर्धेतून निवड झालेले खेळाडू २४ ते २७ आक्टोंबर, २०२५ दरम्यान भटिंडा पंजाब येथे होणार्या आखील भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाला आहे.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन चे पंच यांनी काम पाहिले. तसेच निवड समिती सदस्य म्हणून प्रा. गोविंद सदाशिवराव मारतळे व प्रा. डॉ. मुकेश पवार सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकुर आणि खेळाडू यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत