बिग बाजार परिसरात गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची तत्पर कारवाई
बिग बाजार परिसरात गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक
१५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची तत्पर कारवाई
जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) :
शहरातील बिग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी आरोपीकडून १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता बिग बाजार सर्कलजवळील दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित तरुण गावठी पिस्तूलासह दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. यानंतर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
या पथकात सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, दीपक शिरसाठ, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, भगवान पाटील, पोलीस नाईक भगवान मोरे, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि राहूल पांचाळ यांचा समावेश होता.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची ओळख हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) अशी झाली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण १५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दीपक सुरवळकर हे करीत आहेत.
#JalgaonPolice,#CrimeNews, #IllegalWeapon, #JalgaonCity, #LevajagatNews
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत