Contact Banner

रावेर तालुक्यात शिवसेनेची तालुका बैठक-जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरविणार


/shivsena-taluka-baitak-raver-27-oct-2025


 रावेर तालुक्यात शिवसेनेची तालुका बैठक-जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरविणार


लेवाजगत न्यूज | रावेर प्रतिनिधी-रावेर तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी महत्त्वाची तालुका बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा व रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.


ही बैठक दिनांक २७ ऑक्टोबर २०२५, सोमवार रोजी दुपारी २ वाजता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा (रवि पवार सर) येथे पार पडणार आहे.


या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सन्माननीय उपनेते मा. श्री. गुलाबराव वाघ तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण, स्थानिक पातळीवरील निवडणूक तयारी, तसेच तालुक्यातील विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे.


तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, युवा सेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हे आवाहन नितीन महाजन (शिवसेना तालुका प्रमुख, रावेर),राकेश घोरपडे (शिवसेना शहर प्रमुख, रावेर),संतोष महाजन (शिवसेना शहर प्रमुख, रावेर) आणिभरत नेहते (शिवसेना शहर प्रमुख, सावदा)यांनी संयुक्तपणे केले आहे.


बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.