Contact Banner

शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का! दोन माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 


शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का! दोन माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

लेवाजगत न्युज जळगाव:-    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दोन माजी महापौरांसह अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत.


Sadguru hospital savda


हा भव्य प्रवेश सोहळा आज जी.एम. फाउंडेशनमध्ये जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान बाजार समिती सभापती सुनील महाजन, तसेच इतर अनेक मान्यवरांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

गेल्या काही दिवसांपासून हे सर्व नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, या प्रवेशामुळे शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या सोहळ्याला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. केतकी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेशानंतर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आणि सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राजकीय दृष्ट्या हा प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.