Contact Banner

रावेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची रावेर येथे बैठक

 

shivsena-uddhav-balasaheb-thackeray-group-to-fight-local-body-elections-in-raver-taluka-with-full-strength

रावेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची रावेर येथे बैठक

लेवाजगत न्यूज रावेर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची विशेष बैठक रावेर येथे  पार पडली. या बैठकीत पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी प्रतिपादन करताना सांगितले की, “शिवसैनिक पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीतही शिवसेना ताकदीने लढणार आहे.”

बैठकीस जिल्हाप्रमुख (रावेर लोकसभा क्षेत्र) योगीराज पाटील, जिल्हा उपसमन्वयक अशोक शिंदे, विधानसभा रावेर क्षेत्र प्रमुख रवी पवार, तालुकाप्रमुख नितीन महाजन, तालुका उपप्रमुख श्याम भामरे, तालुका उपप्रमुख (सावदा) मिलिंद पाटील, शहर प्रमुख रावेर राकेश घोरपडे, शहर प्रमुख रावेर संतोष महाजन, शहर प्रमुख सावदा भरत नेते, तसेच सुरेश शिंदे, संतोष महाजन, भावलाल पैलवान, देवानंद यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्ष संघटन बळकटीकरण, प्रचार रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.