Contact Banner

एमपीएससी यशस्वी डाळिंबी सरोदेचा शाल–पुष्पगुच्छ देऊन सत्कार — शिरीष दादा चौधरी व धनंजय भाऊ चौधरी यांची भेट व शुभेच्छा

 

https://levajagatnews.in/dalimbi-sarode-honoured-by-shirish-choudhary-dhananjay-choudhary


एमपीएससी यशस्वी डाळिंबी सरोदेचा शाल–पुष्पगुच्छ देऊन सत्कार — शिरीष दादा चौधरी व धनंजय भाऊ चौधरी यांची भेट व शुभेच्छा

लेवा जगत न्यूज प्रतिनिधी रोझोदा–रावेर तालुक्यातील रोझोदा गावची कन्या आणि राज्य सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारी डाळिंबी रवींद्र सरोदे हिचा नुकताच सन्मान समारंभ माजी आमदार शिरीष दादा मधुकरराव चौधरी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.





या प्रसंगी त्यांनी रोझोदा गावातील डाळिंबी सरोदे यांच्या घरी जाऊन तिला शाल व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमावेळी तिचे आई-वडील, मोठी आई व मोठेबाबा नातेवाईक आणि गावातील नागरिक उपस्थित होते. या सत्कारामुळे रोझोदा गावात अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांनीही “ही आमच्या गावाची शान आहे” अशा शब्दांत अभिव्यक्ती केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.