सावदा येथे भाजप–शिवसेना युतीचा भव्य प्रचार दौरा; मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांची पायी रॅली — उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
सावदा येथे भाजप–शिवसेना युतीचा भव्य प्रचार दौरा; मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांची पायी रॅली — उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) : आगामी सावदा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीकडून प्रचाराची धडाकेबाज सुरुवात झाली आहे. आज शहरात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन तसेच मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य पायी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहराच्या प्रमुख मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा रॅलीचा व्हिडिओ पण बघा-सावदा येथे भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री गिरीश महाजन यांची भव्य रॅली; आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
रॅलीदरम्यान मंत्री आणि आमदार यांनी मतदारांच्या हातात हात घालून पायी प्रचार केला, दुकानदार व नागरिकांना भेटून संवाद साधला आणि रस्त्यावरच्या प्रत्येक चौकात कमळ (भाजप) व धनुष्यबाण (शिवसेना) या चिन्हांवर मतदान करण्याचे आवाहन केले. संपूर्ण शहरात पायी फिरून त्यांनी प्रचार नारळ फोडत निवडणुकीतील विजयी निर्धार घोषित केला.
भाजप–शिवसेना युतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांची यादी
नगराध्यक्ष पदासाठी —
- रेणुका राजेंद्र पाटील (भारतीय जनता पार्टी)
प्रभागनिहाय उमेदवार
- प्रभाग १ : नवाज रमजान तडवी, भावना कोल्हे (भाजप)
- प्रभाग २ : राजेंद्र श्रीकांत चौधरी (भाजप), तबस्सुम बानो पठाण (शिवसेना,बिनविरोध)
- प्रभाग ३ : गजानन ठोसरे (भाजप), अरशीया अंजुम (शिवसेना)
- प्रभाग ४ : नकुल नितीन बेंडाळे, नीलिमा किरण बेंडाळे (भाजप)
- प्रभाग ५ : जयश्री नेहेते, सचिन ब-हाटे (भाजप)
- प्रभाग ६ : प्रतिक्षा भंगाळे, फिरोजखा अबदार खा (शिवसेना)
- प्रभाग ७ : रंजना भारंबे(बिनविरोध, राजेंद्र चौधरी (भाजप)
- प्रभाग ८ : नंदाबाई लोखंडे, पंकज येवले (भाजप)
- प्रभाग ९ : ललिता वायकोळे, नितीन पाटील (भाजप)
- प्रभाग १० : रुखसार पिंजारी, फिरोजखान पठाण बिनविरोध (शिवसेना)
नेत्यांचे वक्तव्य
रॅलीदरम्यान मंत्री गिरीश महाजन म्हणाले —
“सावद्याचा विकास फक्त भाजप–शिवसेना युतीच करू शकते. कमळ व धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून आपल्या शहराला पुढील पाच वर्षांसाठी मजबूत नेतृत्व द्या.”
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले —
“युतीचे सर्व उमेदवार विकास, पारदर्शकता आणि नागरिकांच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक घरातून मतदान बाहेर पडले पाहिजे.”
प्रचाराचे समीकरण
भाजप–शिवसेना युतीकडून अशा प्रकारे पायी रॅली, थेट नागरिकांशी संवाद आणि नेत्यांची उपस्थिती यामुळे निवडणूक चित्र आणखी रंगतदार झाले असून अनेक प्रभागांमध्ये युतीचा प्रचार वेग पकडत आहे. शहरातील मतदारांचे लक्ष आता प्रचारसभांकडे व निर्णायक मतदानाकडे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत