सावदा निवडणूक प्रभाग ५-ब मधील अपक्ष उमेदवार अजय भागवतराव भारंबे यांचा सोमेश्वर नगरमध्ये जनसंपर्क
सावदा निवडणूक प्रभाग ५-ब मधील अपक्ष उमेदवार अजय भागवतराव भारंबे यांचा सोमेश्वर नगरमध्ये जनसंपर्क
लेवाजगत न्यूज सावदा — सावदा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग ५-ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले अजय भागवतराव भारंबे यांनी सोमेश्वर नगर परिसरात मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आशीर्वादाची विनंती केली. या दरम्यान त्यांनी नागरिकांसोबत विकासकामांविषयी सविस्तर चर्चा करून आगामी पाच वर्षांच्या कामाचा आराखडा मांडला.
प्रभागातील नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत करत भरभरून प्रतिसाद दिला. प्रभागातील मूलभूत प्रश्न — पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, ड्रेनेज व्यवस्था, क्रीडा सुविधा व नागरिकांसाठी उभे असलेले विविध प्रश्न याबाबत चर्चा झाली. या समस्या सोडवण्यासाठी विकासनिष्ठ काम आणि पारदर्शक प्रशासन देण्याची हमी त्यांनी मतदारांना दिली.
“आपल्या प्रत्येक घरातील विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. प्रगतीसाठी, पारदर्शक कामांसाठी आणि प्रभागाला मॉडेल प्रभाग करण्यासाठी एक संधी द्या,” असे आवाहन उमेदवार अजय भागवतराव भारंबे यांनी यावेळी केले.
निवडणूक प्रचारात नागरिकांचा उत्साह पाहता प्रभागात तीव्र उत्सुकता व चुरस निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत