Contact Banner

भुसावळ नगरपरिषदेत भाजपाच्या सौ.प्रीती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय!

bhusawal-municipal-election-priti-mukesh-patil-elected-unopposed-ward-7a-bjp-first-victory


भुसावळ नगरपरिषदेत भाजपाच्या सौ.प्रीती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय!

लेवाजगत भुसावळ :भुसावळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पहिला विजयाची नोंद बिनविरोध करून दणका दिला आहे. प्रभाग क्रमांक ७ (अ) येथून सौ. प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्यामुळे शहरात भाजपच्या विजयाची सलामी मिळाली आहे. हा विजय म्हणजे भुसावळकरांनी भाजप आणि त्यांच्या उमेदवारांवर दाखवलेल्या ठाम विश्वासाचा प्रत्यय आहे.

या विजयानिमित्त भाजपा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांच्या पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि नागरिकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीतही भाजपाची घोडदौड आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.