सावदा नगरपालिकेत सौ. रंजनाताई जितेंद्र भारंबे यांची बिनविरोध निवड; भाजप पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा
सावदा नगरपालिकेत सौ. रंजनाताई जितेंद्र भारंबे यांची बिनविरोध निवड; भाजप पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा
लेवाजगत न्यूज ( सावदा प्रतिनिधी) – सावदा नगरपालिकेतील नगरसेवक पदावर भाजपाच्या सौ. रंजनाताई जितेंद्र भारंबे यांची बिनविरोध निवड झाल्याने आज भाजप-शिवसेना युतीतर्फे त्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी रावेर लोकसभा भाजपचे निवडणूक प्रभारी नंदकुमार महाजन, भाजप तालुकाध्यक्ष श्री. दुर्गादास पाटील, सरचिटणीस श्री. महेश अकोले, श्री. विनायक कोळी, भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रेणुका पाटील, सौ. नंदाताई लोखंडे, श्री. जे. के. भारंबे, श्री. विक्की भिडे, श्री. सागर चौधरी, श्री. मनिष भंगाळे तसेच भाजप–शिवसेना युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. रंजनाताई भारंबे यांचे बिनविरोध निवडून येणे ही भाजप-शिवसेनेच्या संघटित कार्याची व नागरिकांच्या विश्वासाची पावती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत