Contact Banner

सहकारातून समृद्धी साधणारे चिनावल आ.अमोल जावळे. चिनावल दूध उत्पादक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन

 

chinawal-dudh-utpadak-sanstha-golden-jubilee-amol-jawale-sahkar-samruddhi

सहकारातून समृद्धी साधणारे चिनावल — आ. अमोल जावळे यांचे प्रतिपादन


वसंत सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात गौरवपूर्ण भाषण

   


लेवाजगत न्यूज चिनावल- 

  चिनावल हे सहकाराचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गावाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून जी समृद्धी साधली आहे, त्यामध्ये वसंत सहकारी दूध उत्पादक संस्था, चिनावल हिचा सिंहाचा वाटा आहे. स्वर्गीय दिगंबर शेठ नारखेडे, वसंतराव महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी “सहकारातून सहकार्य” ही संकल्पना रुजवून चिनावलच्या प्रगतीचा पाया रचला आहे.



आज या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले,

“संस्थेने गेल्या पन्नास वर्षांत सतत प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. यापुढेही ही संस्था सभासदांच्या हितासाठी कार्यरत राहील, अशी मला खात्री आहे. सहकारातूनच समृद्धीचा मार्ग खुला होतो आणि चिनावल हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.”



स्व. वाय. एस. पाटील सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी तज्ञ आणि संस्थेचे संस्थापक संचालक वसंतराव महाजन हे होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून आमदार अमोल जावळे, माजी आमदार अरुण पाटील, दूध संघाचे संचालक ठकसेन पाटील, नितीन चौधरी, रावसाहेब भोसले (भडगाव), दगडू चौधरी (कासोदा), तसेच संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर पाटील, कार्यकारी संचालक शैलेंद्र मोरखडे, जिल्हा दूध संकलन अधिकारी जयेश पाटील, आणि डॉ. सी. एन. पाटील उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरव केला. अध्यक्ष वसंतराव महाजन यांनी संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगताना, “शेतकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग दाखविण्याचे कार्य आम्ही केले. लहानशा रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे,” असे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एन. महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एन. एन. महाजन यांनीच मानले.

या वेळी संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर प्रल्हाद पाटील, व्हाईस चेअरमन अजय महाजन, संचालक प्रशांत लोखंडे, अजय कोल्हे, दिनकर बंगाळे, सागर चौधरी, प्रमोद बोरोले, विशाल लोखंडे, संदीप पाटील, कैलास बंगाळे, कमलाकर पाटील, टोपा महाजन, रवींद्र पाटील, सदानंद परम सागर, सौ. उर्मिला झांबरे, सौ. पुष्पा फलक, उखर्डू भालेराव तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.