Contact Banner

फैजपूर | धनाजी नाना महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा



 फैजपूर | धनाजी नाना महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्युज फैजपूर – धनाजी नाना महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. ताराचंद सावसाकडे यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तसेच भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यावर सविस्तर माहिती दिली.

एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश दत्तात्रय पाटील आणि महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सविता कलवले यांनी संविधानिक मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाला एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाची प्रस्तावना सर्वांनी सामूहिकरित्या वाचून कार्यक्रमाची सांगता झाली. महाविद्यालय प्रशासन व एनएसएस विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे संविधान दिनाचा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.