Contact Banner

फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ “सबका साथ, सबका विकास” हा कार्याचा मूलमंत्र — प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद

 

faizpur-nagarparishad-election-2025-prabhag-1-3-home-to-home-campaign-bjp-damini-saraf


फैजपूर नगरपरिषद निवडणूक २०२५

“सबका साथ, सबका विकास” हा कार्याचा मूलमंत्र — प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद

लेवाजगत न्यूज फैजपूर — नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ व ३ मध्ये महायुतीच्या वतीने प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील समस्या, अपेक्षा व विकासाच्या गरजांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे उमेदवारांनी सांगितले. नागरिकांनी केलेल्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे आणि दाखवलेल्या विश्वासामुळे विजयाचा निर्धार अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ यांच्या सोबत या प्रभागात घर ते घर (Home to Home) प्रचार करत नागरिकांना भेट देऊन महायुतीच्या विकासाच्या संकल्पनांची माहिती देण्यात आली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि पुढील कामकाजाचा आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दौऱ्यात प्रभाग १ व ३ चे भाजपा अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. पाटील पूजा तुषार, श्री. वसिम मेहबूब तडवी आणि शेख निखत परवीण शेख सलीम हे प्रमुख उपस्थित होते.

प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना व सुरक्षितता या महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील प्रत्येक अडचणीवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याचा ठोस संकल्प महायुतीच्या उमेदवारांनी व्यक्त केला.

फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन, सक्षम सुविधा आणि नागरिक प्रथम हा आमचा दृष्टिकोन आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

मतदानाची विनंती

दिनांक २ डिसेंबर रोजी अनुक्रमांक ४ समोर ‘कमळ’ चिन्हावर बटण दाबा
आणि फैजपूरच्या विकासाला गती देण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. सराफ दामिनी पवन तसेच सर्व उमेदवारांना विजयी करा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.