जळगावमध्ये गोळीबार — एकाचा मृत्यू, तिघे जखमी
जळगावमध्ये गोळीबार — एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लेवाजगत न्युज जळगाव:-
जळगाव शहरातील कांचन नगर भागात रविवारी रात्री उशीरा झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास विलास चौक, कांचन नगर येथे दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद उग्र होऊन आकाश सपकाळे उर्फ डोया आणि करण उर्फ तांडव राजपूत यांनी त्यांच्या ताब्यातील पिस्तुलातून गोळीबार केला.
या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर (मृत) तसेच गणेश रवींद्र सोनवणे, तुषार रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे तिघे जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान युवराज बाविस्कर याचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबारानंतर आता पुन्हा शहरात अशीच घटना घडल्याने जळगाव हादरले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नितीन गणापुरे आणि एलसीबी निरीक्षक राहूल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत