Contact Banner

सावदा येथे शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठी इन्कमिंग

 





सावदा येथे शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठी इन्कमिंग

लेवाजगत न्यूज सावदा:- येथे रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला. हा कार्यक्रम सावदा येथील शाम अकोले यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.


या वेळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान पाटील, किशोर पाटील, छोटू पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी, शाम अकोले आणि फिरोज खान पठाण आदींच्या उपस्थितीत नव्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.



या कार्यक्रमात बाजार समिती सदस्य सै. अजगर सै. तुकडू, माजी नगरसेवक शेख अल्लाबक्ष (गुड्डू मेंबर), अमीन शहा, सचिन तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.


या वेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आम्ही युतीसाठी प्रयत्नशील आहोत. मात्र जिल्हा नेतृत्वाचे आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. तरीही सर्व जागांवर लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे.”


भाजपनंतर आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे सावदा शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही इन्कमिंग विशेष लक्षवेधी ठरत आहे.

पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवार संध्याकाळी पाच वाजता कोचुर रोडवरील माजी नगरसेवक शाम अकोले यांच्या निवासस्थानी होणार आहे तरी इच्छुकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तर्फे करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.