अतिवृष्टीने बोदवड तालुका हादरला; खडसे यांनी घेतला हानीग्रस्त भागांचा आढावा
अतिवृष्टीने बोदवड तालुका हादरला; खडसे यांनी घेतला हानीग्रस्त भागांचा आढावा
लेवा जगत न्यूज | बोदवड-काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे बोदवड तालुक्यातील लोवंडी, धोनखेडा, शेवगे, येवती आणि रेवती या गावांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिके, जनावरे आणि शेतीमाल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मंत्री, विधानपरिषद आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हानीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशा सूचना दिल्या.
खडसे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच वेळ आहे.”
या पाहणीदरम्यान रामदास पाटील, आबा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनीही पिकांचे नुकसान आणि ओढ्यांमधील पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाई लवकर मिळावी अशी मागणी केली असून, खडसे यांनी या प्रकरणात सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.



.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत