आज होणार निवडणुकीची घोषणा ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद आज
आज होणार निवडणुकीची घोषणा ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद आज
मुंबई प्रतिनिधी | लेवा जगत न्यूज - राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज, मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई-३२ येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्यभरातील नगर परिषद, नगर पंचायत, तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबतची तयारी, मतदार यादी, आचारसंहिता आणि आगामी निवडणुकीचा कार्यक्रम या संदर्भात महत्त्वाची माहिती या पत्रकार परिषदेत दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार, मा. राज्य निवडणूक आयुक्त पत्रकारांशी थेट संवाद साधणार असून, माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे अथवा आपल्या प्रतिनिधीला पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही पत्रकार परिषद आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तारखा आणि नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्णय स्पष्ट करणारी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
स्थळ: सचिवालय, जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई-३२
वेळ: दुपारी ४.०० वाजता



.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत