थोरगव्हाण गणात रेखा ताईंच्या नावाची जोरदार चर्चा!
थोरगव्हाण गणात रेखा ताईंच्या नावाची जोरदार चर्चा!
सावदा प्रतिनिधी | लेवा जगत न्यूज
पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, थोरगव्हाण गणातून एक सक्षम, अनुभवी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नाव चर्चेत आले आहे — रेखा संजीव पाटील.
रेखा ताई पाटील या रणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असून सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक स्थानिक प्रश्नांवर ठोस पावले उचलली गेली आहेत. गावोगाव संपर्क वाढवून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
विशेष म्हणजे, त्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच नितीन पाटील यांच्या मातोश्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय परंपरेचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकीचा ठेवा या दोन्हींचा उत्तम संगम आहे.
थोरगव्हाण गणातून त्यांच्या इच्छुकपदाची चर्चा रंगू लागल्याने स्थानिक राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून रेखा ताई पाटील या नावाकडे मतदार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, मतदारांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेखा ताई पाटील लवकरच आपली अधिकृत उमेदवारी जाहीर करतील, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीने थोरगव्हाण गणातील राजकीय समीकरणे अधिक रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
रेखा ताई या माजी ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांच्या सुनबाई असून, शिक्षण, सामाजिक कार्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत