न्हावीमध्ये राजकीय भूकंप! अमोलभाऊ जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंचा भाजपमध्ये प्रवेश
न्हावीमध्ये राजकीय भूकंप! अमोलभाऊ जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंचा भाजपमध्ये प्रवेश
लेवाजगत न्युज न्हावी:- रावेर मतदारसंघात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत न्हावी येथील उभाठा आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे न्हावी परिसरात खऱ्या अर्थाने राजकीय हलचल निर्माण झाली आहे.
प्रवेश सोहळ्यात न्हावीचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच चेतन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, महादेव मंदिराचे अध्यक्ष वामन नेहते, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर झोपे, मल्टी सहकारी सोसायटीचे संचालक विलास चौधरी, तसेच डिगंबर गाजरे, वामन तायडे, नेमीदास भंगाळे, चेतन झोपे, सोनू झोपे यांच्यासह काँग्रेस व उभाठा पक्षातील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रवेशामुळे न्हावी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. सहभागी कार्यकर्त्यांनी—
“आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर संपूर्ण विश्वास असल्यानेच भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला,” असे सांगत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी हिरालाल चौधरी, शरददादा महाजन, हर्षल पाटील, नरेंद्र नारखेडे, नारायण चौधरी, गणेश नेहते, भास्कर पिंपळे, उमेश बेंडाळे, भरत पाटील यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत