Contact Banner

सावदा नगरपरिषद निवडणूक २०२५ : पहिल्या दिवशी अर्ज शून्य; आज चार उमेदवारी अर्ज दाखल

 

sawda-nagarparishad-election-2025-first-day-zero-today-four-nominations


सावदा नगरपरिषद निवडणूक २०२५ : पहिल्या दिवशी अर्ज शून्य; आज चार उमेदवारी अर्ज दाखल


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुरू आहे. पहिल्या दिवशी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली, तरी दुपारी ३ वाजेपर्यंत एकही अर्ज नगरपालिका कार्यालयात जमा झाला नव्हता.


निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, सहाय्यक अधिकारी भूषण वर्मा, तसेच बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांचे सहकारी पालिका सभागृहात सतत उपस्थित होते. दहा प्रभागांसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची तपासणी करण्यासाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.


दरम्यान, पहिल्या दिवशी उमेदवार एकही अर्ज न भरल्याने वातावरण शांत होते; मात्र इच्छुक उमेदवारांनी घरपट्टी, पाणीपट्टी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी सुरू ठेवली होती.




 आज शुक्रवार रोजी चार उमेदवारी अर्ज दाखल


आज शुक्रवार दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्या कार्यालयात एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे—


1️⃣ लतेश रवींद्र चौधरी


प्रभाग : ८ ब


प्रवर्ग : सर्वसाधारण


पक्ष : अपक्ष



2️⃣ परेश पितांबर झोपे


प्रभाग : ५ ब


प्रवर्ग : सर्वसाधारण


पक्ष : भारतीय जनता पार्टी (भाजप)



3️⃣ शारदा संतोष भंगाळे


प्रभाग : ५ अ


प्रवर्ग : सर्वसाधारण महिला


पक्ष : भारतीय जनता पार्टी (भाजप)



4️⃣ सिमरन राजेश वानखेडे


प्रभाग : १ ब


प्रवर्ग : सर्वसाधारण महिला


पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.