राधिका रविंद्र जोशी -इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी श्री स्वामिनारायण गुरुकुल शाळेची चमक
राधिका रविंद्र जोशी -इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी श्री स्वामिनारायण गुरुकुल शाळेची चमक
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी)-सावदा येथील श्री स्वामिनारायण इंग्लिश मिडियम (सी.बी.एस.ई.) स्कूल या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची विद्यार्थिनी कुमारी राधिका रविंद्र जोशी (इयत्ता आठवी) हिची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा 2025 अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प.पू.स.गु. शा. भक्तिप्रकाशदासजी स्वामी, उपाध्यक्ष प.पू.स.गु. शा. अनंतप्रकाशदासजी स्वामी, संचालक श्री पी.डी. पाटील साहेब, प्राचार्य श्री संजय वाघुळदे सर, कोऑर्डिनेटर श्री गिरीश नेमाडे सर, पर्यवेक्षिका सौ. अश्विनी चौधरी मॅडम व सौ. माधुरी चौधरी मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राधिकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संस्थेच्या सर्वांकडून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
— लेवा जगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत