भीषण अपघात! प्रवासी ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक — पहिला डबा थेट मालगाडीवर चढला; 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भीषण रेल्वे अपघात! प्रवासी ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक — सहा प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
लेवाजगत न्युज प्रतिनिधी : बिलासपूर (छत्तीसगड):-छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी एक भीषण रेल्वे अपघात घडला. MEMU प्रवासी ट्रेनने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. हा अपघात संध्याकाळी सुमारे चारच्या सुमारास झाला असून, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की प्रवासी ट्रेनचा पहिला डबा थेट मालगाडीवर चढला. त्यामुळे डब्यांचा चक्काचूर झाला आणि प्रवासी अडकले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही वेळातच रेल्वे प्रशासन, पोलीस व आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी अजूनही काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता असल्याने क्रेन, ऍम्ब्युलन्स व अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सिग्नल तोडल्यामुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. रेल्वे मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत