Contact Banner

सावदा नगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीचे संकल्पचित्र जाहीर -सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार

 

savda-bjp-shivsena-sankalp-patra-candidate-list-2025


सावदा नगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीचे संकल्पचित्र जाहीर -सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी): सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीने “समृद्ध सावदा – विकासाच्या प्रत्येक पावलावर” या घोषवाक्यासह सर्वसमावेशक संकल्पचित्र जाहीर केले आहे. सावदा शहराच्या सर्वांगीण विकासाची दिशा आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करणाऱ्या या संकल्पचित्रात पाणी, रस्ते, पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा, बाजारव्यवस्था आणि रोजगार यांसह नागरिकाभिमुख विविध योजना नमूद करण्यात आल्या आहेत.

   संकल्पचित्र प्रकाशित करताना युतीने नागरिकांना आवाहन केले की, सावदा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सुंदर संकल्पचित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्ह ‘कमळ’ आणि शिवसेना उमेदवारांसाठी ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर शिक्का मारून नगरसेवकांना बहुमताने विजयी करा तसेच नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून द्या.


संकल्पचित्रातील प्रमुख मुद्दे


    पाणीपुरवठा सुधारणा – अपूर्ण जलवाहिनी योजना पूर्णत्वास नेणे, नियमित व शुद्ध पाणीपुरवठा, पाणी टाक्यांची स्वच्छता व वॉटर टेस्टिंग.

    स्वच्छ शहर उपक्रम – रस्ते स्वच्छता, कचरा डेपो सुधारणा व सर्वसमावेशक स्वच्छता अभियान.

    रस्ते व सांडपाणी व्यवस्था – नवीन वसाहतीत पक्के रस्ते व मेट्रो शहरांप्रमाणे भूमिगत नालेप्रणाली.

   व्यापारी व बाजार सुधारणा – आधुनिक व्यावसायिक संकुल, मार्केट झोनिंग, स्थानिक व्यवसाय प्रोत्साहन व रोजगार निर्मिती.

   छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व बगीचा सुशोभीकरण – इतिहास व संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी भव्य उपक्रम.


शिक्षण, क्रीडा आणि युवक विकास

    अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा; स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुसज्ज वातावरण

   उद्याने, क्रीडांगण, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

    ग्रीन सिटी उपक्रम – वृक्षारोपण, सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे, वॉल पेंटिंग, दिशादर्शक फलक

   एक–खिडकी योजना — सर्व शासन सेवा एका ठिकाणी

   युवक कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन, उद्योजकता वाढ अभियान

   भटके प्राणी नियंत्रण – निर्बीजिकरण व लसीकरण


युतीने स्पष्टपणे जाहीर केले की, हा फक्त जाहीरनामा नसून सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी दिलेला सर्वांगीण विकासाचा ठाम संकल्प आहे.

“पूर्ण बहुमत – संपूर्ण विकास” या घोषणेसह सावदा शहरातील मतदारांकडून विश्वास व पाठिंबा मागण्यात आला आहे.

भाजप–शिवसेना युतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांची यादी

नगराध्यक्ष पदासाठी

सौ. रेणुका राजेंद्र पाटील (भारतीय जनता पार्टी शिवसेना युती)


भारतीय जनता पार्टी व शिवसेना प्रभागनिहाय नगरसेवक उमेदवारांची यादी


प्रभाग उमेदवार पक्ष-

नवाज रमजान तडवी, भावना कोल्हे भाजप

राजेंद्र श्रीकांत चौधरी (भाजप), तबस्सुम बानो पठाण शिवसेना (बिनविरोध)

गजानन ठोसरे (भाजप), अरशीया अंजुम( शिवसेना)

नकुल नितीन बेंडाळे भाजप, नीलिमा किरण बेंडाळे भाजप.

जयश्री नेहेते, सचिन ब-हाटे भाजप

प्रतिक्षा भंगाळे, फिरोजखा अबदार खा शिवसेना

रंजना भारंबे बिनविरोध, राजेंद्र चौधरी भाजप

नंदाबाई लोखंडे, पंकज येवले भाजप

ललिता वायकोळे, नितीन पाटील भाजप

१० रुखसार पिंजारी शिवसेना,फिरोजखान पठाण शिवसेना(बिनविरोध)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.