Contact Banner

सोमवारी दिनांक १ रात्री १० वाजता थांबणार पालिका प्रचाराचा धुराळा

 

omvari-ratri-10-vajeperyant-nivadnuk-prachar-band


सोमवारी दिनांक १ रात्री १० वाजता थांबणार पालिका प्रचाराचा धुराळा

लेवाजगत न्यूज मुंबई : प्रतिनिधी -नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रचार सोमवार, १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंतच करता येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रचार कधीपर्यंत करता येणार याबाबत मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.


जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद करण्याची तरतूद असते. मात्र नगरपरिषद व नगरपंचायत कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी प्रचार करण्यास बंदी आहे. त्यामुळे आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवार रात्री १० वाजेपर्यंत प्रचार परवानगीयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोमवार रात्री १० नंतर पूर्णपणे बंदी

सोमवार, १ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर

सार्वजनिक सभा,प्रचार फेऱ्या ,ध्वनिक्षेपकांचा वापर या सर्वांवर पूर्णपणे बंदी लागू राहील.

२ डिसेंबरला मतदान – सुटी जाहीर

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान मंगळवार, २ डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानात मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी संबंधित क्षेत्रातील नागरिकांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.