Contact Banner

सावदा पालिका निवडणूक : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय न्यायालयात कायम


 सावदा पालिका निवडणूक : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय न्यायालयात कायम


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – सावदा नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग क्र. २-ब, प्रभाग क्र.४-ब, आणि प्रभाग क्र.१०-ब येथील उमेदवारीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले आदेश मा. जिल्हा न्यायालयाने कायम ठेवले असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २५ नोव्हेंबर रोजी देण्यात आला.

प्रभाग क्र. २-ब आणि प्रभाग क्र.१०-ब मध्ये संबंधित उमेदवारांवर तीन अपत्य प्रकरणी हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी दोन्ही उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता.

दरम्यान, प्रभाग क्र. ४-ब मध्ये एका उमेदवाराच्या शपथपत्रातील बाबींवर हरकत घेण्यात आली होती. मात्र, ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत सदर उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता.

या सर्व निर्णयांविरोधात हरकती घेतलेल्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश योग्य ठरवत, सर्व निर्णय न्यायालयाने कायम ठेवले, अशी माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली.


दरम्यान, या प्रकरणांवरील न्यायालयीन निर्णय जाहीर झाल्याच दिवशी — म्हणजेच २५नोव्हेंबरला माघारीची अंतिम तारीख होती. परिणामी प्रभाग क्र. ४-ब मधील उमेदवार आशा सुरेंद्र जावळे व नेहा जितेंद्र गाजरे यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

यामुळे या प्रभागात आता दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होत असून निवडणूक अधिक रोचक बनली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.