सावदा नगरपरिषद निवडणुकीत आज एकमेव अर्ज दाखल -भाजपा उमेदवार मंदाकिनी वारके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सावदा नगरपरिषद निवडणुकीत आज एकमेव अर्ज दाखल -भाजपा उमेदवार मंदाकिनी वारके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक पाच (अ) मधून अर्ज दाखल; भाजपा-शिवसेना युतीबाबत तांदलवाडीत बैठक होणार
सावदा (लेवा जगत न्यूज प्रतिनिधी):
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सावदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच (अ) मधून एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या मंदाकिनी चंद्रकांत वारके यांनी आज दुपारी सुमारे अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्या प्रभागातून कोणाला भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात येते हे अजून 17 तारखेलाच दुपारी तीन वाजता कळेल.
अर्ज दाखल केल्यानंतर मंदाकिनी वारके यांनी तत्काळ घरोघर प्रचाराची सुरुवात केली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार सज्ज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात केली आहे.
पक्षाच्या वतीने उद्या नामनिर्देशन पत्र दाखल होण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे.
भाजपा-शिवसेना युतीबाबत हालचाली वेगवान
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीबाबतही सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत.
आजच तांदलवाडी येथे युती संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
या बैठकीनंतर सावदा नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत