Contact Banner

सुहास भंगाळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय युती किंवा महायुती झाल्यास उमेदवारी नाही, अन्यथा अपक्ष म्हणून रिंगणात

लेवा जगत न्यूज, सावदा (प्रतिनिधी)

सावदा शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधून राजकारणात पदार्पण करण्याची घोषणा नुकतीच केलेले उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुहास शालिग्राम भंगाळे यांनी आज प्रसिद्ध निवेदनाद्वारे एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

भंगाळे यांनी स्पष्ट केले की,“सावद्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये माझा विस्तृत मित्रपरिवार आहे. युती किंवा महायुती झाल्यास मी कोणत्याही गोंधळाला कारणीभूत ठरणार नाही आणि अशा परिस्थितीत मी उमेदवारी दाखल करणार नाही. मात्र, जर युती अथवा महायुती घडली नाही, तर मी प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरेन.”

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुहास भंगाळे यांनी अलिकडच्या काळात विविध जनहित उपक्रमांमुळे लोकांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या या संतुलित आणि संयमी भूमिकेचे शहरभरात स्वागत होत असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.