श्रीनगरातील नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट – ९ जणांचा मृत्यू, २७ जखमी; दहशतवादी कटाचा तपास सुरू
श्रीनगरातील नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट – ९ जणांचा मृत्यू, २७ जखमी; दहशतवादी कटाचा तपास सुरू
लेवाजगत न्युज, श्रीनगर :-
श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटामुळे जम्मू-कश्मीर हादरले आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, महसूल विभागातील अधिकारी अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
काय घडले?
नौगाम पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील जप्त स्फोटकांची तपासणी करत होते. हरियाणातील फरीदाबाद येथे उघडकीस आलेल्या मोठ्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ मध्ये मिळालेली स्फोटके येथील ठाण्यात ठेवण्यात आली होती.
तपास सुरू असतानाच अचानक जबरदस्त स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की पोलिस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही काही लहान स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली.
मृतांमध्ये कोण कोण?
या स्फोटात मृत्यू पावलेल्यांत—
-
विशेष तपास संस्था (SIA) चे १ अधिकारी
-
फॉरेन्सिक सायन्स लॅबचे ३ तज्ज्ञ
-
२ छायाचित्रकार
-
महसूल विभागाचे २ अधिकारी
-
स्थानिक १ शिंपी
म्हणून एकूण ९ जणांचा मृत्यू झाला.
तसेच ३ नागरिकांसह २७ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दहशतवादी कट की हाताळणीतील चूक?
स्फोट जप्त स्फोटके तपासत असताना झाल्याने दोन प्रमुख संशय तपासले जात आहेत—
1️⃣ स्फोटक हाताळताना झालेली चूक
2️⃣ दहशतवादी कटाचा भाग म्हणून घडवून आणलेली घटना
एनआयए, एसआयए व इतर सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत