डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजीवन डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची यशोगाथा
डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजीवन
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची यशोगाथा
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-जीवनातील दुःखद प्रसंग, सततचा मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या एका ३३ वर्षीय तरुणाला जळगाव येथील येथील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून नवजीवन दिले आहे. हा उपचारप्रवास केवळ वैद्यकीय यशापुरता मर्यादित नसून, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करणारा आणि प्रेरणादायी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाच्या वडिलांचे सुमारे दहा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले. या धक्क्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला आणि हळूहळू नैराश्याची लक्षणे दिसू लागली. याच काळात मद्यपानाची सवय लागून ती काही महिन्यांतच व्यसनात परिवर्तित झाली. या तीव्र मानसिक तणावाखाली रुग्णाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
परिस्थितीची गंभीरता ओळखून कुटुंबीयांनी विलंब न करता त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली , , आणि यांच्या टीमने रुग्णाचे सखोल मूल्यांकन केले.
त्यानंतर ईसीटी (इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव्ह थेरपी), औषधोपचार, समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि व्यसनमुक्ती उपचारांचा समन्वय साधत एक सविस्तर व वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात आली. उपचार प्रक्रियेत वैयक्तिक समुपदेशन, कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग, गटचर्चा, योग व ध्यानधारणा यांचा प्रभावी वापर करण्यात आला.
सातत्यपूर्ण उपचार, वैद्यकीय देखरेख आणि मानसिक आधारामुळे रुग्णाच्या मनःस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. आज हा रुग्ण पूर्णपणे व्यसनमुक्त असून, आत्मविश्वासाने पुन्हा आपल्या कामात सक्रिय झाला आहे.
कोट :
“मानसिक आजार हा लपवून ठेवण्याचा विषय नाही. वेळीच ओळखून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेतले, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो,” असे मत मानसोपचार विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
— डॉ. ऋचिता आटे, निवासी डॉक्टर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत