डोंबिवली मध्ये हंबर्डीकर रहिवाशांचे स्नेहसंमेलन उत्साहात
डोंबिवली मध्ये हंबर्डीकर रहिवाशांचे स्नेहसंमेलन उत्साहात
खेमचंद पाटील बदलापूर -
हंबर्डी गावातील मुंबईस्थित रहिवाशी तथा वास्तव्यास असलेल्या व हंबर्डीकर बंधू - भगिनींचे एकत्रित येऊन स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम डोंबिवली जवळील कोपर येथील म्हाळसाई माता मंदिर येथे २१ डिसेंबर रविवार रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हंबर्डीतील मुंबईमध्ये वास्तवास असलेल्या व्यक्तींना एकत्रित येऊन सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हंबर्डीकर सर्व राहिवाश्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कित्येक वर्षापासून हंबर्डीतील असलेल्या व्यक्तीनी त्या निमित्ताने सर्व गावकरी एकत्र येऊन चर्चा व स्नेह भोजन केले . व विविध कार्यक्रमात सर्व व्यक्तींचा आणि कुटुंबाचा परिचय करून घेण्यात आला. त्यावेळेस हंबर्डीतील जेष्ठ व्यक्तीमत्व दिलीप भंगाळे, वासुदेव पाटील, शशिकांत किरंगे, चुडामण नारखेडे यांच्यासह आदर्श कलाशिक्षक अमोल पाटील या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यावेळी हंबर्डी गाववरती मनोमन प्रेम, स्नेह, आपुलकी दाखवून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेस लहान बाल कलाकारांनी विविध नृत्य सादर केले. कार्यक्रमाला सेल्फी पॉईंट म्हणून आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली यांच्यातर्फे भेट देण्यात आला होता. सेल्फी पॉइंट चा आनंद प्रत्येक हंबर्डीकर ग्रामस्थांनी घेतल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत नेहेते सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी नियोजन समिती द्वारे आयोजक कुंदन पाटील कल्याण , हेमंत नेहेते( सर) डोंबिवली , शेखर पाटील (सर) डोंबिवली , किरण किरंगे बदलापूर , खेमचंद पाटील बदलापूर , किरण तळेले डोंबिवली, मुरली पाटील डोंबिवली, दीप्ती पाटील डोंबिवली , सुवर्णा पाटील डोंबिवली, अमित नारखेडे डोंबिवली , या सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत