फैजपूर नगरपरिषदेत भाजप नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन सिद्धेश्वर वाघुळदे गटनेते, सुरज गाजरे उपगटनेतेपदी एकमताने निवड
फैजपूर नगरपरिषदेत भाजप नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन
सिद्धेश्वर वाघुळदे गटनेते, सुरज गाजरे उपगटनेतेपदी एकमताने निवड
लेवाजगत न्यूज फैजपूर :- फैजपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित भारतीय जनता पक्ष (भाजप) नगरसेवकांचा अधिकृत गट आज जिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिकरित्या स्थापन करण्यात आला. या गटाच्या बैठकीत नगरसेवक सिद्धेश्वर वाघुळदे यांची गटनेतेपदी, तर नगरसेवक सुरज भाऊ गाजरे यांची उपगटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांनी गटनेते आणि उपगटनेते यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी संघटनात्मक एकजूट, शहर विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
फैजपूर नगरपरिषदेमध्ये भाजप गट अधिक बळकट होऊन आगामी काळात नागरी सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत