Contact Banner

पाणीपुरीचा अन्नकूट व भव्य तुळशी पूजन अमेरिकेत संप्रदायामध्ये प्रथमच अनोखा धार्मिक उपक्रम

 

panipuricha-annakut-va-bhavya-tulshi-pujan-ameriket-sampradayat-prathamach-anokha-dharmik-upkram

पाणीपुरीचा अन्नकूट व भव्य तुळशी पूजन

अमेरिकेत संप्रदायामध्ये प्रथमच अनोखा धार्मिक उपक्रम

शिकागो (लेवा जगत प्रतिनिधी):
अमेरिकेतील येथे संप्रदायामध्ये प्रथमच भव्य पाणीपुरी अन्नकूटोत्सव१० हजार तुळशीदलांचे पूजन अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडले. पाश्चिमात्य देशात राहूनही सनातन धर्माची परंपरा, संस्कार व धार्मिक मूल्ये जपणाऱ्या या मंदिराने हा उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

दि. २८ डिसेंबर, रविवार रोजी आयोजित या विशेष कार्यक्रमात भगवानांना ५,००० हून अधिक विविध प्रकारच्या पाणीपुरींचा अन्नकूट अर्पण करण्यात आला. तसेच २५ डिसेंबर – तुळशी दिवस निमित्ताने भव्य तुळशी पूजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दोन्ही धार्मिक सोहळ्यांचा उपस्थित भक्तांनी मनोभावे लाभ घेतला.

या प्रसंगी शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी अनादी मूळ अक्षरमूर्ती सद्गुरु श्री गोपालानंद स्वामी यांच्या परच्यांची दिव्य कथा कथन करून भक्तांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुयोग्य व प्रभावी संचालन शास्त्री मुक्तप्रकाशदासजी स्वामी यांनी केले.

अन्नकूटाचे यजमान पू.भ. श्री जनकभाई भगवानदास पटेल, चि. रेयांश व त्यांच्या कुटुंबीयांनी या सेवेचा लाभ घेतला. तब्बल ५,००० पेक्षा अधिक पुऱ्या स्वतःच्या हातांनी तयार करण्याची सेवा या कुटुंबाने अत्यंत भक्तिभावाने केली. संतांनी यजमान कुटुंबाला आशीर्वाद देत त्यांचा सन्मान केला.

अन्नकूटोत्सवाची आकर्षक संकल्पना व सजावट वडतालधाम परिवारातील युवती मंडळातील बहिणींनी अथक परिश्रमातून साकारली.
या कार्यक्रमास स्नेहलभाई, विनोदभाई, धर्मभाई आदी विश्वस्तांसह सुभाषभाई, केयूरभाई, योगेशभाई, कनुदादा, डॉ. ब्रिजेशभाई, प्रदीपभाई, दिलीपभाई, भरतभाई, किरणभाई, भूपेंद्रदादा, परागभाई, चेतनभाई, जीतुभाई तसेच प्रतीक, क्रिश, हेमंतभाई, विजयभाई, चिंटू, कुश, किशन, भानु आदी अनेक भक्तांनी विविध सेवांमध्ये सहभाग घेतला.

सुमारे ३५० भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांनी पाणीपुरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.