Contact Banner

फैजपूर पालिका निवडणूक : भाजपचे वर्चस्व, दामिनी पवन सराफ यांचा दणदणीत विजय

faizpur-palikha-nivadnuk-bjp-varchasva-damini-pavan-saraf-yanchya-dandanit-vijay


फैजपूर पालिका निवडणूक :भाजपचे वर्चस्व, दामिनी पवन सराफ यांचा दणदणीत विजय

लेवाजगत न्यूज फैजपूर (प्रतिनिधी):
नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (भाजप) ने आपले वर्चस्व सिद्ध करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. एकूण जागांपैकी भाजपाला ९ जागांवर विजय मिळाला असून, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांनी १०,०८७ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत —

प्रभागनिहाय निकाल

  • प्रभाग १ अ: तडवी हकिम एमत () – १,८३७ मते
  • प्रभाग १ ब: शेख सुमईय्या बी. कुरबान () – १,८२७ मते
  • प्रभाग २ अ: शे. युनूस शे. अय्युब () – १,३९२ मते
  • प्रभाग २ ब: शे. सादीका शेख दानिश (काँग्रेस) – १,५६६ मते
  • प्रभाग ३ अ: शे. अन्वर शे. असगर () – बिनविरोध
  • प्रभाग ३ ब: सफूरा बी. महेमूद (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – ६,८७५ मते
  • प्रभाग ४ अ: भारंबे दिपाली जितेंद्र (भाजप) – ७३६ मते
  • प्रभाग ४ ब: चौधरी विनोद अरुण (अपक्ष) – ९६९ मते
  • प्रभाग ५ अ: केतन डिगंबर किरंगे (काँग्रेस) – बिनविरोध
  • प्रभाग ५ ब: निलीमा महाजन (भाजप) – बिनविरोध
  • प्रभाग ६ अ: चौधरी जयश्री नरेंद्र (भाजप) – १,१०३ मते
  • प्रभाग ६ ब: सागर होले (भाजप) – बिनविरोध
  • प्रभाग ७ अ: इंगळे प्रियंका ईश्वर (काँग्रेस) – ८३१ मते
  • प्रभाग ७ ब: मंडवाले महेंद्र अशोक (भाजप) – १,४५३ मते
  • प्रभाग ८ अ: नेहेते सुनिता अनंत (भाजप) – ९९६ मते
  • प्रभाग ८ ब: शे. ईरफान शे. इकबाल (काँग्रेस) – ९९१ मते
  • प्रभाग ९ अ: कोळी निकिता प्रकाश (भाजप) – १,३५६ मते
  • प्रभाग ९ ब: गाजरे सुरज रमेश (भाजप) – ९४७ मते
  • प्रभाग १० अ: सिद्धक्षवर वाघुळदे (भाजप) – बिनविरोध
  • प्रभाग १० ब: भावना संदीप भारंबे (भाजप) – ५३९ मते
  • प्रभाग १० क: चौधरी अमिता हेमराज (अपक्ष) – ६८१ मते

एकूण जागांचा पक्षनिहाय तपशील

  • भाजप : ९
  • काँग्रेस : ५
  • अपक्ष : ३
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : १
  • एमआयएम : १

निकाल जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांचे समर्थकांनी अभिनंदन केले. भाजपच्या या यशामुळे फैजपूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.