दामिनी सराफ म्हणाल्या, “प्रिय फैजपूरकरांनो, आपल्या प्रत्येक मतदारबंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानते
दामिनी सराफ म्हणाल्या,
“प्रिय फैजपूरकरांनो, आपल्या प्रत्येक मतदारबंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानते
लेवाजगत न्यूज फैजपूर (प्रतिनिधी):
फैजपूर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार दामिनी पवन सराफ यांनी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल फैजपूरकरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. लोकशाहीच्या सन्मानासाठी प्रचंड संख्येने मतदान करून फैजपूर शहराने संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दामिनी सराफ म्हणाल्या,
“प्रिय फैजपूरकरांनो, आपल्या प्रत्येक मतदारबंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानते. आपण दिलेला मतांचा कौल म्हणजे फैजपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास आहे. विकास, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या मार्गावर आपण नवी पहाट उजळवणार आहोत. तुमचा निर्णय आमची जबाबदारी असून ती जबाबदारी निभावण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
आजच्या मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय शिस्त आणि शांतता राखून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव यशस्वी केला. मतदानासाठी लवकर सकाळपासून नागरिकांनी मोठ्या संख्येने रांगा लावल्या आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
दामिनी सराफ यांनी आजच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या— 🔸 सर्व मान्यवर व सजग मतदारांचे
🔸 मार्गदर्शक वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी
🔸 प्रचार मोहिमेत रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे
🔸 पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुण मतदारांचे
🔸 शांत आणि शिस्तबद्ध मतदानाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांनी पुढे सांगितले की,
“आपल्या सहकार्याने फैजपूरचा विकास अधिक वेगाने पुढे जाईल. आधुनिक सुविधा, पायाभूत विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण — या सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही समर्पित राहू.”
फैजपूर शहरात आज लोकशाही महोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला असून सर्वांच्या सहभागामुळे विकासाचा नवा अध्याय सुरु झाला आहे, असा विश्वास दामिनी सराफ यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत