वासुदेव नेत्रालय दिनदर्शिकेचे डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते विमोचन
वासुदेव नेत्रालय दिनदर्शिकेचे डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते विमोचन
लेवाजगत न्यूज जळगाव : वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या दिनदर्शिकेचे विमोचन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वासुदेव नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, नेत्रतज्ज्ञ डॉ. रेणुका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या दिनदर्शिकेमध्ये वर्षभरातील विविध कार्यक्रम, सण व उत्सवांची उपयुक्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, गोदावरी अंतर्गत ह.भ.प. जगन्नाथ महाराज नेत्रालय येथे सकाळी ५ वाजताच नियमित मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू केल्या जातात. गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही सेवा कौतुकास्पद असून ‘सातत्य म्हणजेच डॉ. नितु पाटील’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डॉ. नितु पाटील यांनी आजपर्यंत ३० हजारांहून अधिक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते केवळ नेत्ररोगतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक जीवनातही सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित आहेत. वासुदेव नेत्रालयातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून प्रत्येक निवडणुकीत मतदान केलेल्या नागरिकांना तपासणी शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाते.
कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना औषधे, बेड उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय प्रस्ताव तयार करण्यात मोलाची मदत केली. स्वतः नर्मदा परिक्रमा केलेले असल्याने अध्यात्माचीही त्यांना विशेष ओढ आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी वासुदेव नेत्रालयाच्या प्रांगणातील ‘रेवा कुटी’ येथे सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत