Contact Banner

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेर–यावल तालुक्यात विशेष शासकीय दाखले व सेवा शिबिरांचे आयोजन

amol-jawale-raver-yawal-shaskiya-dakhale-seva-shibir


आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेर–यावल तालुक्यात विशेष शासकीय दाखले व सेवा शिबिरांचे आयोजन

लेवा जगत न्यूज रावेर प्रतिनिधी-रावेर व यावल तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज, सुलभ आणि वेळेत मिळावा, या उद्देशाने आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून विशेष शासकीय दाखले व सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून ही शिबिरे १५ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत गावोगावी आयोजित करण्यात येणार असून, दररोज दुपारी २.०० वाजता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात ही शिबिरे सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच वेळ आणि खर्चाची बचत व्हावी, यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत महसूल प्रशासनाने रावेर व यावल तालुक्यात व्यापक स्वरूपात या विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.

या शिबिरांमध्ये संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, आयुष्मान भारत आरोग्य कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखले तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या e-KYC सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी-वाढ करणे, दुरुस्ती करणे आदी महत्त्वाची कामेही या शिबिरांत केली जाणार आहेत.

रावेर तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

रावेर तालुक्यात १६ डिसेंबर रोजी कुसुंबे बु. व कुसुंबे खु., १७ डिसेंबर रोजी लोहारा व चिंचोटी, १८ डिसेंबर रोजी नेरुळ, १९ डिसेंबर रोजी अजनाड व चोरवड, २२ डिसेंबर रोजी शिंदखेडा, २३ डिसेंबर रोजी पातोंडी व बोहर्डे, २४ डिसेंबर रोजी चिनावल, २६ डिसेंबर रोजी अंजदा व नांदुरखेडा, २९ डिसेंबर रोजी मुंजलवाडी व चुनाबर्डी, ३० डिसेंबर रोजी रमजीपूर, ३१ डिसेंबर रोजी कर्जोद, १ जानेवारी रोजी अभोडा बु. व अभोडा खु., २ जानेवारी रोजी थेराळा व धुरखेडा, ५ जानेवारी रोजी पाडळे बु. व पाडळे खु., ६ जानेवारी रोजी भोकरी, ७ जानेवारी रोजी तामसवाडी व बोरखेडा, ८ जानेवारी रोजी लालमाती व सहस्रलिंग, ९ जानेवारी रोजी मोहमांडली, अंधारमळी व तिड्या, तर १२ जानेवारी रोजी मंगरूळ येथे शिबिरे होणार आहेत.

यावल तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

यावल तालुक्यात १५ डिसेंबर रोजी भालोद, १६ डिसेंबर रोजी न्हावी प्र. यावल, १७ डिसेंबर रोजी वाघळूद, १८ डिसेंबर रोजी भालशिव, १९ डिसेंबर रोजी पिंप्री, २२ डिसेंबर रोजी अट्रावल, २३ डिसेंबर रोजी राजोरा व मायसांगवी, २४ डिसेंबर रोजी निंबगाव टेंभी, २६ डिसेंबर रोजी बोरखेडा बु., २९ डिसेंबर रोजी आमोदा, ३० डिसेंबर रोजी वढोदा, कारंजी व रिधुरी, १ जानेवारी रोजी दुसखेडा, २ जानेवारी रोजी पाडळसा, ५ जानेवारी रोजी चारमळी, ६ जानेवारी रोजी बोरावल बु., ७ जानेवारी रोजी पिंपरुड आणि ८ जानेवारी रोजी आसारबारी येथे ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा दारात मिळणार असून प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.