जानवी प्रभू यांचा "भारत गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मान "
जानवी प्रभू यांचा "भारत गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मान "
उरण लेवाजगत न्यूज सुनिल ठाकूर
७७ व्या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त 'विश्व मानवाधिकार परिषद भारत' (World Human Rights Council India) तर्फे चेंबूर येथील चेंबूर कर्नाटका हायस्कूलच्या जानवी प्रभू यांना त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील समर्पित आणि निस्वार्थ सेवेबद्दल 'VMP भारत गौरव - आदर्श शिक्षक पुरस्कार' ने सन्मानित करण्यात आले आहे.
'VMP भारत गौरव पुरस्कार' हे डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ आणि संरक्षण दलातील जवानांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील राष्ट्राप्रेम असलेल्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल दिले जातात.
यापूर्वी २०२५ च्या शिक्षक दिनानिमित्त, 'विश्व मानवाधिकार परिषद भारत' तर्फे जानवी प्रभू यांना 'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक पुरस्कार - २०२५' अंतर्गत 'प्रशस्तीपत्र' देऊन गौरवण्यात आले होते.
'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार' हा शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रात गरीब व उपेक्षित घटकांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून जानवी प्रभू यांचा सत्कार करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत