कीर्ती बोरोले यांना हिरकणी महाराष्ट्राची २०२५ पुरस्कार प्रदान
कीर्ती बोरोले यांना हिरकणी महाराष्ट्राची २०२५ पुरस्कार प्रदान
लेवाजगत प्रतिनिधी (बदलापूर) खेमचंद पाटील- लेक माहेरचा कट्टा' हे प्रामुख्याने स्त्रियांसाठी असलेले पंधरा लाख महिलांचं एक आदराचं व्यासपीठ आहे यांच्या तर्फे आयोजित आणि वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड. प्रस्तुत हिरकणी पुरस्कार सोहळा २०२५/२६ ए.सी.पाटील काॅलेज,खारघर येथे ७ डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील सासर -कै.डी.एन.बोरोले सर , न्हावी आणि माहेर- आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै. देवराम दामोदर महाजन, वडील कै. सुधाकर देवराम महाजन(भाऊराव) पिळोदा यांची आर्मी मधली देशसेवा शिस्तप्रियता प्रेरणादायी ठरली.
कर्मभूमी डोंबिवली मध्ये वास्तव्यास असलेल्या सौ. कीर्ती धीरज बोरोले यांना हिरकणी महाराष्ट्राची २०२५ पुरस्कार एल.पी.गायकवाड सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कीर्ती बोरोले यांचा तरुणाईसाठी खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. भुसावळ या सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या शहरात जन्मलेल्या कीर्ती बोरोले यांना योग, अध्यात्म, सुसंस्कार आणि समाजसेवेची गोड शिकवण लहानपणापासूनच घरातून मिळाली. कीर्ती बोरोले ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग , B.Sc ,योग प्रबोध , M.A., (योगशास्त्र) योग शिक्षक , योग कन्सल्टन्ट , रेकी कन्सल्टन्ट , आयुर्वेदिक वेलनेस एक्स्पर्ट, न्यूट्रिशनिस्ट , नेचरोपॅथी तज्ञ या पदव्या घेऊन उच्चशिक्षित आहेत. तसेच समाजकार्यातील पाया हा त्यांच्या विवाहानंतर पती श्री. धीरज बोरोले यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा, प्रेरणा यामुळे योगसेवा आणि समाजकार्यात कीर्ती बोरोले यांचे योगदान फार मोठे आहेत.
कल्याणम योग सेंटर ची स्थापना योग, प्राणायाम, ध्यान, मानसिक आरोग्य, आयुर्वेद यांचा जागर प्रसार. नैसर्गिक व आयुर्वेदिक वेलनेस उत्पादनांद्वारे आरोग्य जागृती. या माध्यमातून महिलांसाठी समाजात प्रबोधन करीत असतात. तसेच लेवा युथ फोरम केंद्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून लेवा समाजात कार्य कौतुकास्पद आहे. कीर्ती बोरोले यांना हिरकणी महाराष्ट्राची २०२५ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत